|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप

पुण्यात मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप 

पुणे / प्रतिनिधी :

अल्टिमेटम फायटिंग लीगतर्फे पुण्यात शिवाजी स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप होणार आहे. महाराष्ट्रात ही चॅम्पियनशीप प्रथमच होत आहे. 22-23 डिसेंबर रोजी होणाऱया या चॅम्पियनशीपमध्ये भारतभरातील सुमारे 500 स्पर्धकांमध्ये मुकाबला होणार आहे. विशेष म्हणजे दि ग्रेट खली या चॅम्पियनशीपला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती मास्टर युसूफ मॅथ्यू यांनी दिली.

अभिनेता सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटात अशाप्रकारची चॅम्पियनशीप दाखविण्यात आली आहे. मात्र भारतात म्हणावा तितका या खेळाचा प्रचार-प्रसार झालेला नाही. त्यामुळे या खेळाचा प्रचार प्रसार होण्यासाठी ही चॅम्पियनशीप पुण्यात होत आहे. भविष्यात प्रो-कबड्डीप्रमाणे स्वरूप देण्याचा विचार आयोजकांचा आहे.

चॅम्पियनशीपचे आयोजन करणारी अल्टिमेट फायटिंग लीग ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल आर्ट समुहाची सलग्न आहे. या समुहात सुमारे 130 देशांचा सहभाग आहे.