|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहार पोलिसांना ‘सर्वोच्च’ फटकार

बिहार पोलिसांना ‘सर्वोच्च’ फटकार 

माजी मंत्री वर्मा फरारच : महासंचालकांना पाचारण

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिहार सरकारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या घरातून शस्त्रास्त्रs जप्त झाल्यानंतरही अद्याप त्यांना अटक न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अत्यंत कठोर शब्दांत टिप्पणी केली आहे. न्यायालयाने बिहार पोलिसांना फटकारत राज्याच्या पोलीस महासंचालकांना हजर राहण्याचा आदेश दिला आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

एका माजी मंत्र्याचा महिन्याभरात पोलीस सुगावा लावू न शकल्याने आम्ही हैराण आहोत. संबंधित मंत्र्याचा शोध लावण्यास का अपयश आले हे पोलिसांनी सांगावे. याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी हजर रहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

‘व्वा, छान, कॅबिनेट मंत्री (मंजू वर्मा) फरार आहेत, छानच. मंत्री फरार आहे आणि ती कोठे आहे हे कोणालाच माहिती नसावे असे कसे घडू शकते? अशी टिप्पणी न्यायाधीश लोकूर यांनी बिहार पोलिसांना उद्देशून केली आहे.

बिहारच्या बहुचर्चित मुजफ्फरपूर निवारा केंद्रातील अल्पवयीन मुलींवरील बलात्काराप्रकरणी मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर हा माजी समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांचा समर्थक मानला जातो. या प्रकरणावरून वर्मा यांना नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. वर्मा यांच्या शोधासाठी पोलिसांनी छापे टाकले आहेत. 

घरात मिळाली शस्त्रास्त्रs

अल्पवयीन मुलींवरील बलात्काराप्रकरणी सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी मंजू वर्मा यांच्या बेगुसराय येथील निवासस्थानी छापा टाकला होता. या छाप्यावेळी त्यांच्या घरातून शस्त्रास्त्रांसह 50 काडतूसे जप्त करण्यात आली होती. या कारवाईनंतर मंजू वर्मा आणि त्यांचे पती चंद्रशेखर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा नोंद झाल्यापासून मंजू वर्मा फरार आहेत.

Related posts: