|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पांगुळ गल्ली रुंदीकरणाला स्वयंस्फूर्तीचा मुहूर्त

पांगुळ गल्ली रुंदीकरणाला स्वयंस्फूर्तीचा मुहूर्त 

प्रतिनिधी / बेळगाव

शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱया पांगुळ गल्ली रस्ता रुंदीकरणास अखेर प्रारंभ झाला आहे. रस्ता रुंदीकरणात येणारा इमारतीचा भाग मालमत्ताधारकांनी स्वयंस्फूर्तीने हटविण्यास सोमवारपासून प्रारंभ केला आहे. मात्र, स्थगिती घेतलेल्या परिसरातील मालमत्ताधारकांनी अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही.

 महापालिका प्रशासनाने पंधरा दिवसांपूर्वी मार्किंग करून दिले होते. पण दिवाळी सणानंतर रुंदीकरण करण्याची विनंती मालमत्ताधारक व व्यावसायिकांनी केली होती. यामुळे दिवाळी संपताच सोमवारपासून रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेकडून मालमत्ता हटविण्यास सुरुवात करण्यात येणार होती. पण केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सरकारी सुटी जाहीर करण्यात आली असल्याने मालमत्ता हटविण्याचा मुहूर्त चुकला आहे. पण महापालिकेकडून मालमत्ता हटविण्याची कारवाई झाल्यास मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्मयता आहे. दुकानांसमोर बसविण्यात आलेले जम्प्स आणि काही शेडची मोडतोड होऊ शकते. यामुळे रस्ता रुंदीकरणात येणारा इमारतीचा भाग आणि जम्प्स हटवून घेण्याचे आवाहन माजी उपमहापौर मीना वाझ यांनी मालमत्ताधारकांना केले. याची दखल घेऊन मालमत्ताधारकांनी स्वयंस्फूर्तीने मालमत्तांचा भाग हटवून घेण्यास प्रारंभ केला आहे. जम्प्स आणि रस्त्यामध्ये येणारी शेड हटवून घेण्यात येत आहेत. जुन्या कौलारू घरांचा भागही मालमत्ताधारकांनी हटवून घेऊन रस्ता रुंदीकरणास सहकार्य दर्शविले आहे. रस्त्याचे रुंदीकरण 30 फूट करण्यात येणार असल्याने बहुतांश मालमत्ताधारकांनी सहमती दर्शवून स्वयंस्फूर्तीने मालमत्ता हटवून घेण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे वर्षानुवर्षे रखडलेले रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.

चौकट करणे

काही मालमत्ताधारकांनी विरोध दर्शवून मालमत्ता हटविण्यास न्यायालयाकडून स्थगिती घेतली आहे. यामुळे मालमत्ताधारकांनी मालमत्ता हटवून घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्थगिती घेतलेल्या भागाचे रुंदीकरण रखडणार का? अशी विचारणा होत आहे. पांगुळ गल्लीत एकीकडे रुंदीकरणासाठी मालमत्तांचा भाग आणि जम्प्स हटविण्यात येत आहेत, दुसरीकडे अश्वत्थामा मंदिरसमोर रस्त्यावरच स्टॉल थाटलेल्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे. रस्त्यावर पार्किंग, वाहनांची वर्दळ असतानाही या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी स्टॉल थाटण्यात येतात. यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भरच पडत आहे. रुंदीकरणानंतर स्टॉल हटविणार की स्टॉलधारकांची मनमानी सुरूच राहणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. 

Related posts: