|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Automobiles » महिंद्रातर्फे स्कॉर्पिओचा नवा एस9 प्रकार दाखल

महिंद्रातर्फे स्कॉर्पिओचा नवा एस9 प्रकार दाखल 

मुंबई / प्रतिनिधी :

महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम लि.) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने स्कॉर्पिओ या आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचा एस9 हा नवा व वैशिष्टय़ांनी समृद्ध प्रकार दाखल केल्याचे जाहीर केले. स्कॉर्पिओ एस9ची किंमत 13.99 लाख रुपये (एक्सशोरूम दिल्ली) आहे. ही गाडी भारतभरातील महिंद्रा डीलरशिपमध्ये तातडीने उपलब्ध होणार आहे.

स्कॉर्पिओचा एस9 हा प्रकार दाखल झाल्याबद्दल बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे सेल्स व मार्केटिंग ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे प्रमुख वीजय राम नाकरा म्हणाले की, स्कॉर्पिओने भारतातील ऑटो उद्योगाचा चेहरामोहरा बदलला आणि आजही या वाहनाचे एसयूव्ही श्रेणीतील प्रभुत्व कायम आहे. नव्या स्कॉर्पिओ एस9 मध्ये, स्कॉर्पिओचा ताकदीचा आणि थरार व साहस यांचा मूलभूत डीएनए कायम ठेवत, आकर्षक दरामध्ये अत्याधुनिक वैशिष्टय़े उपलब्ध करण्यात आली आहेत.