|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्वतःच्या तीन मुलींची पित्यानेच केली निर्घृण हत्या

स्वतःच्या तीन मुलींची पित्यानेच केली निर्घृण हत्या 

ललितपूर

 उत्तरप्रदेशच्या ललितपूर जिल्हय़ातील एका गावात क्रूर पित्याने स्वतःच्या तीन मुलींची हातोडय़ाने वार करत निर्घृण हत्या केली आहे. दोन मुलींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिसऱया मुलीने रुग्णालयात नेले जात असताना अखेरचा श्वास घेतला. तर शेजाऱयांनी खुनी पित्याला पकडून पोलिसांच्या हाती सोपविले आहे. वीर गावातील छेदामी उर्फ छिद्दु कुशवाह याने मंगळवारी पहाटे 4 वाजता घरात झोपलेल्या स्वतःच्या तीन मुली अंजली (12), राधिका (7) आणि विशाखा (4) यांच्यावर हातोडय़ाने सपासप वार केले. यानंतर तिघींवर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. आग लागल्याचे पाहून शेजाऱयांनी तेथे धाव घेत आरोपी छेद्दूला पकडले आणि पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच आरोपीने पत्नीला जबर मारहाण केली होती. या मारहाणीला वैतागून पत्नीने दोन मुलींसह रविवारी माहेरी धाव घेतली होती.

Related posts: