|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » वर्षभरात काश्मीरमध्ये 200 दहशतवाद्यांना कंठस्नान

वर्षभरात काश्मीरमध्ये 200 दहशतवाद्यांना कंठस्नान 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

यंदाच्या वर्षात भारतीय जवनांनी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारतीय जवानांनी मंगळवारी काश्मीर खोऱयातील केरन सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे यंदाच्या वर्षात भारतीय लष्कराच्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 200 वर गेला आहे. वर्ष संपायला अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. काश्मीर खोऱयात भारतीय लष्कराची कारवाई सुरुच असल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची शक्मयता आहे.

 

यंदाच्या वर्षात काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई केली. लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईचा मोठा दणका जैश-ए-मोहम्मदला बसला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 50 टक्के दहशतवादी मारले गेले. तर हिज्बुलच्या 40 टक्क्मयांहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कर-ए-तोयबालादेखील भारतीय जवानांनी दणका दिला. त्यांचे 33 टक्के दहशतवादी यंदाच्या वर्षात मारले गेले.