|Monday, July 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सुरुवात मेमरी क्लिनिकची

सुरुवात मेमरी क्लिनिकची 

1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्ये÷ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे मेमरी क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे. ज्येष्ठांचे तीन प्रकार असतात 59 ते 66 वयोगट, 65 ते 75 आणि 75 आणि त्यापुढील वयोगट असे तीन प्रकार पडतात. वाढत्या समाजात ज्ये÷ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे. वार्धक्मयामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधीही मागे लागतात. शारीरिक व्याधीसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते.

वृद्धावस्थेत अनेक मानसिक बदल, मानसिक ताण-तणाव, स्मृतिभंश, अशाप्रकारचे मनोविकार होत असतात. वार्धक्मयामध्ये बऱयाचशा वर्तन विषयक गोष्टी म्हणजे अचानक भाव-विवश होणे, भयंकर रागावणे, अखंडपणे बोलत राहणे, चिंतित असणे, निराश होणे इत्यादी अनेक प्रसंगातून वार्धक्मयातील मानसिक अस्वस्थता दिसून येत असतात. कधी कधी घरातील तसेच समाजातील आपल्या स्थानाविषयी वयोवृद्ध व्यक्तीच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि मग नैराश्याची भावना निर्माण होते. वाढत्या आयुर्मानाबरोबर वयोवृद्धांच्या आरोग्याविषयीच्या समस्याही वाढत आहेत. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, डिमेंशिया इ. आज भारतात 4 दशलक्ष लोक स्मृतिभंश या आजाराने ग्रस्त आहेत, असे असले तरीही स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) हा एक असा आजार आहे ज्याची पुरेशी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचली नसल्याने असे रुग्ण उपचारापासून वंचित राहतात.

स्मृतिभ्रंश हा असा आजार आहे ज्यात व्यक्तीच्या मानसिक व बौद्धिक क्षमतांचा उत्तरोत्तर अधिकाधिक ऱहास होत जातो आणि त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होतो. ज्ये÷ नागरिकांना बरेचदा आपण वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे आठवत नाही. साध्या-साध्या गोष्टी आठवत नाहीत. वयानुसार होणारा बदल म्हणून आपण सोडून देतो. पण त्याकडे नीट पहायला हवे. कदाचित ती डिमेंशियाची सुरुवात असू शकते. ‘मेमरी ऑफ एजिंग’ ही तक्रार सामान्यतः उतारवयात असू शकते.

स्मृतिभ्रंशाची लक्षणेः-

=विसर पडणे-विशेषतः नवीन गोष्टींचा विसर पडणे.

=एकाग्रता : भाषणकौशल्य कमी होणे.

=स्वतःची काळजी घेण्याची क्षमता कमी होते.

=अव्यवस्थितपणा.

=चिडचिडेपणा, हट्टीपणा.

=एकटे बसणे, बोलणे कमी होणे.

=रस्ता हरवणे.

=वारंवार त्याच गोष्टी विचारणे

=स्थळकाळाचे भान न राहणे.

दुर्लक्षिले गेल्याची भावना व त्यातून येणारे नैराश्य व आजाराच्या पुढच्या अवस्थेत किंवा उपचाराअभावी रुग्णाला भास होणे, भ्रम होणे, झोपेचे वेळापत्रक बदलणे आदी लक्षणे दिसतात. वाढत्या वयाबरोबर या आजाराची शक्मयता वाढते. त्यामुळे त्यांच्यात या आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते.

स्मृतिभंशाची कारणेः-

स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) हा एक आजार नसून मेंदूच्या कोणत्या भागातील मज्जा पेशींमध्ये बिघाड झाला आहे यावर त्याची लक्षणे व प्रकार अवलंबून आहेत. साधारणपणे वयाच्या 60 नंतर मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. स्मरणशक्ती कमी होत जाते. हातापायांची हालचाल कमी होणे, रोजच्या कामाचा विसर पडणे या गोष्टी वाढत जातात. मेंदूतील पेशी नाश पावल्या की पुन्हा जिवंत होत नाहीत. त्यामुळे बुद्धीचा ऱहास होतो.

औषधोपचार

स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) हा पूर्णपणे बरा होणारा आजार नाही. परंतु उपलब्ध औषधोपचाराने आपण बौद्धिक क्षमतांच्या ऱहासाचा वेग कमी प्रमाणात थांबवू शकतो. स्मृतिभ्रंशाच्या काही भावनिक लक्षणांवर उदा. चिडचिडेपणा, भास, भ्रम, अव्यवस्था, नैराश्य इत्यादीवर उपचार होऊ शकतो व त्यामुळे रुग्णांना सांभाळण्यास मदत होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे आहे ते रुग्णांची काळजी घेणाऱया व्यक्तीचे समुपदेशन व रुग्णांची योग्य काळजी घेण्यास शिकविणे.

डिमेंशिया तीन टप्प्यामध्ये विभागलेला आहे.

=सौम्य डिमेंशिया, =मध्यम डिमेंशिया, =गंभीर डिमेंशिया

स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची काळजी घेताना-आपल्या जवळच्या व्यक्तीस स्मृतिभ्रंशाचा आजार आहे हे कळल्यावर मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो.

रुग्णांची काळजी कशी घ्यावी?

=झोपणे, जेवणे किंवा शौच इत्यादीसाठी रोज ठरावीक वेळेची सवय लावा.

=सोपे शब्द व छोटय़ा वाक्मय रचनेचा वापर करावा.

=घराचा रस्ता दाखण्यासाठी विशेषतः बेडरूम आणि बाथरूमच्या खुणा करून ठेवा.

=खूप प्रश्न विचारू नका. शक्मय तिथे विचारण्याच्या ऐवजी माहिती द्या.

=शांत व संयमी राहा.

=©ग्णांना लहान मुलांसारखे वागवू/बोलू नका.

=©ग्णांचे म्हणणे ऐकण्यास पुरेसा वेळ द्या.

रुग्णांची काळजी घेणाऱयाने स्वतःची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. काळजी घेणाऱया क्यक्ती निराश होऊ शकतात. रग्णांची काळजी घेताना काळजी घेणाऱया व्यक्तीचा संपूर्ण दिनक्रम रुग्णाभोवती फिरू लागतो. कधी कधी रग्णांची तब्येत सांभाळताना स्वतःच्या तब्येतीकडे, इच्छा आकांक्षाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे याचा फायदा तर होत नाहीच उलट नवीन पेच निर्माण होतो.

निरोगी वृद्धापकाळासाठीः-

=संतुलित व पुरेसा आहार.

=नियमित व्यायाम.

=दारू, तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहणे.

=नियमित आरोग्याची तपासणी करून घेणे.

=कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद.

=नातेवाईक तसेच मित्रमंडळांच्या संपर्कात राहणे.

या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्मृतिभंश (डिमेंशिया) या आजाराकरिता सिंधुदुर्गा जिल्हा रुग्णालयामध्ये मेमरी क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे. आठवडय़ातील सोमवार व बुधवार या दोन दिवस ओपीडी नंबर 30 येथे रुग्णांची तपासणी करण्यात येते. जास्तीत जास्त रुग्णांची या मेमरी क्लिनिंकचा लाभ घ्यावा.

रेश्मा भाईप