|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » leadingnews » कायदेशीर अडचणी नसतांना आरक्षण रोखल्याचा नारायण राणेंचा आरोप

कायदेशीर अडचणी नसतांना आरक्षण रोखल्याचा नारायण राणेंचा आरोप 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राणे समितीने अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर त्यामध्ये राजकारण झाले. नवीन सत्ता आली आणि काही पेच निर्माण करण्यात आले, असा आरोप राणे समितीचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिणीशी बोलताना केला आहे. कोणत्याही कायदेशीर अडचणी नसताना आरक्षण रोखण्यात आले, असेही राणे म्हणाले.

‘मी भाजपच्या विरोधात बोलत नाही, मात्र त्यावेळी काही लोकांनी राजकारण करत आरक्षणाला विरोध केला, काही लोकांना कोर्टात पाठवले. कोर्टात जाणारे कोण आहेत? सर्वांची चौकशी केल्यावर ते दिसून येतील’ असेही राणे म्हणाले. ज्यांनी आरक्षणाच्या मुद्यात राजकारण केले त्यांची नावे योग्य वेळ आल्यावर सांगणार असल्याचेही ते म्हणाले. आमच्या समितीचा अहवाल आम्ही कायदेशीर कक्षेत राहूनच दिला. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबींचे सर्वेक्षण करूनच आम्ही अहवाल दिला होता. आम्ही 18 लाख कुटुंबाचा सर्व्हे केला होता, मागासवर्गीय आयोगाने 45 लाख कुटुंबाचा सर्व्हे केला आहे. त्यामुळे यात आणि आमच्या सर्व्हेत वेगळे असे काही नसेल, त्यामुळे आरक्षण देणे शक्मय आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: