|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » दिवाळीत वाहन खरेदी मंदावली

दिवाळीत वाहन खरेदी मंदावली 

पिंपरी / प्रतिनिधी :

दिवाळीतील आठ दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीत निम्म्याने घट झाल्याचे आरटीओतील वाहन नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे. वाहन उद्योगावरील मंदीचे मळभ अद्याप पूर्णतः दूर झालेले नाहि. त्यातच विमा महागल्याने वाहनांच्या किंमतीत सात ते दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचा पारिमाण वाहन खरेदीवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

दिवाळीत विशेषतः पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी शुभ मानले जाते. आरटीओसाठीहि हा काळ सुगीचा मानला जातो. वाहन नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला चांगला महसूल मिळतो. दरवर्षी वाहन खरेदीच्या संख्येत वाढ होत असते. मात्र, यंदाची दिवाळी वाहन विक्रेत्यांसह आरटीओसाठीहि निराशाजनक ठरली. गतवर्षी दिवाळीच्या आठ दिवसांमध्ये 5 हजार 924 वाहनाची नोंदणी पिंपरी – चिंचवड आरटीओ कार्यालयाकडे झाली होती. मात्र, यंदा अवघ्या 2 हजार 459 वाहनांची नोंदणी झाली आहे. 

वाहन उद्योगावर अद्याप मंदीचे मळभ आहे. त्यातच नवीन वाहनाची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा, तर मोटारीसाठी तीन वर्षाचा विमा (किमान थर्ड पार्टी) काढणे बंधनकारक केल्यानंतर आता मालक-चालकाचा 15 लाखांचा अपघात विमा काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांचा विमा महागला आहे. पाfरणामी वाहनाच्या किंमतीत पाच ते सात टक्के वाढ झाली आहे. 

याबाबत बोलताना पिंपरी -चिंचवडचे उपप्रादेशिक पाfरवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले, यावर्षी दसऱयामध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी वाहन नोंदणी झाली होती. दिवाळीतहि नोंदणीचा आकडा कमी आहे. 

Related posts: