|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » भाजपाचे अध:पतन अस्वस्थ करणारे- अनिल गोटे

भाजपाचे अध:पतन अस्वस्थ करणारे- अनिल गोटे 

प्रतिनिधी / जळगाव :

ज्यांनी मोदींच्या प्रतिमेला जोडे मारले, मुख्यमंत्री यांचे श्राध्द घातले त्यांना आज भाजपात प्रवेश दिला जात आहे. गेली ३० वर्ष ज्यांनी आपल्याला विरोध केला त्या गुंडांना या भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केवळ मतांची वाढ व्हावी म्हणून देत आहे .हे भाजपाचे अध:पतन मनाला अस्वस्थ करणारे आहे, अशी भावना भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी एका पत्राव्दारे व्यक्त केली आहे.

सोमवारी भाजपाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे धुळयाचे आमदार अनिल गोटे यांनी एक सात पानी पत्र लिहून आपल्या मनातील वेदना भाजपाच्या सर्व आमदारांपुढे मांडत गुंडांच्या टोळयांना पक्षात प्रवेश देउुन पक्षश्रेष्ठी कुणाला अच्छे दिन आणत आहेत असा बोचरा सवाल या पत्रात केला आहे.

धुळे महापालिकेची निवडणुक जाहीर झाली असून भाजपा प्रदेशच्या भूमिकेने धुळयात भाजपात मोठया प्रमाणावरगटबाजी उफाळली आहे .संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यामुळे ही उफाळल्याचा सप्ष्ट आरोप आ. गोटेंनी केला आहे. डॉ. भामरे हे आपल्याप्रदीर्घ वाटचालीत साधे नगरसेवक देखील होउु शकले नाहीत. अकरा वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला पण पक्षाने महापालिकेत कसे का होईना ,यश मिळवण्यासाठी गुंडांच्या टोळयांना पक्षात प्रवेश दिला. खरे तर पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांची शक्ती उभावावी, अशी आपली भूमिका होती पण ही भ्ज्ञूमिका पक्षालापटली नसल्याचे नमूद करत डॉ. भामरे भाजपात आल्यापासून गटबाजी सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्या जेष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनात व एक जवळचा सहकारी म्हणून काम केले. आजचा भाजपा हा या नेत्यांचा राहिलेला नाही भाजपाचे होत असलेले पतन हे आपणा सर्वांना विनाशाकडे घेऊन जाणारे आहे .माझी जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली जनसंघाचा मी संघटन मंत्री होतो संघाच्या सूचनेवरून शेतकरी संधटनेत गेलो, पण शरद जोशींशी न पटल्याने संघटनेचा राजिनामा देउुन बाहेर पडलो. आपल्यावर संघ विचारांचा पगडा असल्याने कोणत्याही अमिषांना बळी न पडता भाजपातच राहीलो असे सांगत माझे राजकीय शत्रू असलेले नामचिनगुंड भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे व्यावसायिक मित्र असल्याचा आरोपगोटे यांनी केला आहे .

आज ज्या प्रवृत्ती विरूध्द लढत असल्याने जनतेने आपल्याला तीन वेळा निवडून दिले अशा जनतेचा विश्वासघात करू शकत नसल्याने तसेच ज्यांनी उभे आयुष्य खर्ची घालून भाजपा वाढवला तो आज राहीलेला नसल्याने आपण १९ नोव्हेंबरला विधानसभा सदस्यदत्वाचा राजिनामा देत असल्याचे म्हटले आहे.

Related posts: