|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू

कलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू 

वार्ताहर / कणकवली:

कलमठ येथील पोस्ट कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी झालेल्या अपघातातील जखमी साबाजी शंकर लाड (70, गोठणे-मालवण) यांचा बुधवारी
उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवार 12 नोव्हेंबरला कलमठ येथून आचरा रस्त्याने चालत जात असतांना त्यांना कणकवली – आचरा एसटीची धडक बसली होती. त्यानंतर कलमठ ग्रामस्थांनी एसटी व त्यावेळी तेथून जात असलेला ट्रक्टर अडवून पोलिसांना अपघाताची माहिती दिली होती. याप्रकरणी एसटी व ट्रक्टर पोलिसांत आणत चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर साबाजी यांचे नातू विठ्ठल अरविंद गावडे (कलमठ बाजारपेठ) यांनी कणकवली पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार एस. टी. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या अपघातात साबाजी लाड यांचा डावा पाय प्रॅक्चर झाला होता. त्यांना अपघातानंतर तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय व त्यानंतर अधिक उपचारासाठी पडवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कदम यांनी दिली.