|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहारमध्ये रालोसप नेत्याची हत्या, राजकीय वाद वाढणार

बिहारमध्ये रालोसप नेत्याची हत्या, राजकीय वाद वाढणार 

पाटणा 

 बिहारमध्ये राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे (रालोसप) उपेंद्र कुशवाह आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. छठनिमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांच्या दरम्यान गुंडांनी राजधानी पाटण्यानजीक रालोसप नेत्याची गोळय़ा झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर कुशवाह यांनी पुन्हा एकदा नितीश सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित पेले आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान अगोदरच वाप्युद्ध पेटले आहे. रालोसप नेते अमित रंजन यांची मंगळवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आले. या घटनेनंतर मृत नेत्याच्या घरी पोहोचलेले रालोसप अध्यक्ष कुशवाह यांनी बिहारमधील नितीश सरकारला गलिच्छ राजकारण सोडून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला.