|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » बनवालचे कास्यपदक थोडक्यात हुकले

बनवालचे कास्यपदक थोडक्यात हुकले 

वृत्तसंस्था / बुचारेस्ट

येथे सुरू असलेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेत मंगळवारी 77 किलो वजन गटातील ग्रिको रोमन पद्धतीच्या कास्यपदकच्या लढतीत भारताचा मल्ल साजन बनवालला पराभव पत्करावा लागला. बनवालचे कास्यपदक थोडक्यात हुकले.

हरियाणाच्या 20 वर्षीय साजन बनवालने या स्पर्धेत बऱयापैकी कामगिरी केली पण त्याला शेवटी पदकविना राहावे लागले. रशियाच्या इस्माईल सैदखेसनोव्हने बनवालचा 6-5 अशा गुणांनी पराभव करत कास्यपदक मिळविले. अलिकडे झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या युरोपियन कुस्ती स्पर्धेत रशियाच्या इस्माईलने रौप्यपदक मिळविले होते. साजन बनवालने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले पहिले सुवर्णपदक चालू वर्षात झालेल्या कनिष्ठाच्या आशियाई स्पर्धेत पटकाविले होते. बुचारेस्टमधील या स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात विविध वजन गटात भारताच्या अन्य सहा मल्लांची कामगिरी निराशजनक झाली. त्यांना एकही लढत जिंकता आली नाही.