|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला

मातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला 

प्रतिनिधी/ वडूज

तडवळे (ता. खटाव) येथे मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार महेश ईश्वर फाळके यांचा ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या या घरच्या सत्काराने ‘रंगा व कली’ या दोन भूमिकाने प्रदिध्दीस आलेले फाळके चांगलेच भारावून गेले.

मूळचे तडवळे येथील रहिवाशी असणारे महेश फाळके सद्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. फाळके  यांनी ‘झी मराठी’ वाहिनीवर चालणाऱया जय मल्हार मालिकेतील ‘रंगा’ची तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठू माऊली’ मालिकेतील कलीची भूमिका चांगलीच गाजत आहे. आगामी काळात त्यांना ‘कागर’ या मराठी चित्रपटातही संधी मिळाली आहे. त्यांच्या या दैदिप्यमान वाटचालीबद्दल ग्रामस्थांतर्फे प्राचार्य आनंदराव नांगरे यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक धनंजय साबळे यांनी केले.

यावेळी प्राचार्य नांगरे, डॉ. महादेव पाटील, विकास साबळे, सुरेश फाळके यांची भाषणे झाली. कार्यक्रमास उपसरपंच पी. डी. पाटोळे, माजी सरपंच गोपीनाथ खाडे, काकासाहेब साबळे, पोपट सानप आदींसह मान्यवर उपस्थित होते. भगवान फाळके यांनी आभार मानले. याप्रसंगी नागरिक उपस्थित होते.

Related posts: