|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पाठांतर करण्यापेक्षा ज्ञान समजून घ्या, तर विचारक्षमता वाढेल : डॉ. नागनाथ कोतापल्ले

पाठांतर करण्यापेक्षा ज्ञान समजून घ्या, तर विचारक्षमता वाढेल : डॉ. नागनाथ कोतापल्ले 

ऑनलाईन टीम / पुणे :

वाचनातून माणसाला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. अनेक गोष्टी समजतात त्यामुळे माणूस विचार करू लागतो. आजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करण्याची सवय लावली आहे. तुम्हाला शिकविलेले ज्ञान समजून घ्या तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. नवे प्रश्न तेव्हा निर्माण होतील जेव्हा आपण वाचायला सुरूवात करू, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.

पाठांतर करण्यापेक्षा ज्ञान समजून घ्या, तर विचारक्षमता वाढेल : डॉ. नागनाथ कोतापल्ले

      आम्ही पुणेकर संस्थेतर्फे व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत पुण्यातील आंबेगाव तालुक्मयातील दुर्गम आदिवासी भागात सायकली व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आंबेगाव तालुका फलोदे गावातील शहीद राजगुरु ग्रंथालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख, उद्योजिका नयना चोपडे,पंडित वसंत गाडगीळ, सरपंच मनिषा मेमाणे, आम्ही पुणेकर संस्थेचे सचिव हेमंत जाधव, अरविंद जडे, अखिल झांजले, दत्ता गायकवाड, समीर देसाई, अ‍ॅ[. दिलीप हांडे, डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. प्रियंक जावळे, शरद देशमुख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी 300 पुस्तके देखील देण्यात आली. डॉ.नागनाथ कोतापल्ले म्हणाले, सायकल आणि पुस्तक हा मुलांसाठी सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. हा उपक्रम म्हणजे जगण्याबरोबर पुस्तक असे समीकरणच वाटते. तसेच अशा ग्रामीण गावात मदत उपलब्ध होऊ लागली, तर देश नक्कीच विकसीत होईल. त्याकरीता धर्मादाय आयुक्तालयातर्फे देण्यात येणा-या सुविधा प्रबळ झाल्या तर जनसेवेची मोठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. दिलीप देशमुख म्हणाले, शिक्षणासाठी खेड्यातील मुलांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्यासाठी नक्की प्रयत्न करू. धर्मदाय आयुक्तालयाकडून दुर्गम आदिवासी भागात मुलांना एक हजार सायकल वाटपाचा प्रकल्प केला आहे. आम्ही पुणेकर संस्थेतर्फे व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमसाठी सायकली कमी पडल्यास मदत केली जाईल, असे ही त्यांनी सांगितले. हेमंत जाधव म्हणाले, आम्ही पुणेकर संस्थाच्या व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्मयातील दुर्गम आदिवासी भागातील तळेघर, राजापूर, पिंपरी, चिखली, फलोदे, जांभोरी, पाटण, आंगणे अशा एकूण 23 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी 500 ते 600 सायकली तत्काळ पुरविण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सहधमार्दाय आयुक्तांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.