|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » ओयो कंपनीचे सीईओ म्हणून घोष यांची निवड

ओयो कंपनीचे सीईओ म्हणून घोष यांची निवड 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली |:

हॉस्पिटेलिटी कंपनी ओयोने गुरुवारी इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष यांची  भारत आणि दक्षिण आशियाच्या सीईओपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. घोष यांचा कार्यकाळ यावर्षाच्या डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ओयो कंपनीच्या स्थानिक बाजारातील भारत तसेच चीनमध्ये व्यापारात वृध्दी करण्याचा प्रयत्न असल्याने ही नियुक्ती केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ओयो हॉटेल्स अँड होम्स मध्ये येण्यापूर्वी घोष हे इंडिगोमध्ये अध्यक्ष तसेच पूर्व संचालक होते. ओयो हॉटेल्स अँड होम्स फौंडर अँड ग्रुपचे सीईओ रितेश अग्रवाल यांना यापुढे घोष हे अहवाल सादर करणार आहेत.

घोष आमच्या समुहाशी जोडले गेल्यामुळे ओयो हॉटेल्सच्या हॉस्पिटेलिटी इंडस्ट्रीला एका नव्या वळणावर पोहोचण्यास मदत मिळणार आहे, असे कंपनीचे रितेश अग्रवाल यांनी म्हटले आहे. घोष यांच्या अनुभवाचा लाभ कंपनीला होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.