|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट

कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट 

ऑनलाईन टीम / पुणे :

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण केंद्रीत अजेंडय़ाच्या विरोधात दलित समाज गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून अटकेतील आरोपींनी केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून, सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

शनिवारवाडा येथे 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेच्या दुसऱया दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्हय़ातील पाच आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत,  सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपू आणि कॉ. मंगलू अशा दहा जणांविरोधात 5 हजार 160 पानी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात 80 साक्षीदारांचे जबाब नोंदविल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

आरोपींवर पोलिसांनी भादंवि कलम 153 (अ), 505 (1) (ब), 120 (1), 121, 121 (अ), 124 (अ), 34, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967 सुधारित अधिनियम 2012 कलम 13, 16, 17, 18, 18 (ब), 20, 38, 39, 40 ही कलमे लावली आहेत. या प्रकरणातील पाच आरोपींना सहा जूनला अटक केली होती.

Related posts: