|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » तामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

तामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ’गाजा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले. गुरुवारी कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकले. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील 76 हजार 290 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली. प्रशासनाने घेतलेल्या चोख खबरदारीमुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

मात्र नागपट्टनमा येथे प्रचंड पाऊस आणि तुफान सुरुच आहे. दोन तासात या चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत. पुढच्या 24 तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्मयता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर आहे. ‘गाजा’ या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग, केरळमधील काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मच्छिमारांना 12 नोव्हेंबरपासून समुद्रात न जाण्याची सूचनाही देण्यात आली होती.

Related posts: