|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आरपीडी कॉलेजच्या ‘आव्हान’ महोत्सवाला प्रारंभ

आरपीडी कॉलेजच्या ‘आव्हान’ महोत्सवाला प्रारंभ 

शहर, तालुक्यासह जिल्हय़ातील 800 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रतिनिधी/ बेळगाव

शालेय विद्यार्थ्यांना कॉलेज विश्वाचे दर्शन होऊन त्यांच्या मनातील भीती, दडपण कमी होण्यासाठी एसकेई सोसायटीच्या आरपीडी पदवीपूर्व कॉलेजमध्ये ‘आक्हान 2018’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱया महोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. वसंतराव पोतदार कॉलेजचे प्राचार्य एस. के. अंबेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लज्जतदार पदार्थांची स्पर्धा रंगतदार ठरली. ते पदार्थ विक्रीसही ठेवण्यात आले होते. याचबरोबर विद्यार्थ्यांना महोत्सवाचे फोटो टिपण्याची संधी कॉलेजने उपलब्ध करून दिली होती. यातील उत्कृष्ट फोटो काढणाऱया विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर टाकाऊपासून टिकावू या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ वस्तूंपासून शोभिवंत वस्तू तयार केल्या.

या महोत्सवामध्ये बेळगाव शहर, तालुका व जिल्हय़ाभरातील 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी ऍड मॅड शो, अन्नोत्सव, फोटोग्राफी, टाकाऊपासून टिकावू, अशा स्पर्धा पार पडल्या तर दुसऱया दिवशी गोष्ट सांगणे, पथनाटय़, अन्नोत्सव व फोटोग्राफी अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कलांना वाव मिळत आहे.

अनुष्का आपटे हिच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य के. बी. मेलेद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एस. एस. धरनट्टी यांनी करून दिला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. एम. शिरवलकर होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

 

 

Related posts: