|Friday, May 24, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

आठवडय़ाची सुरुवात थोडी कटकटीची होणार आहे. घरातील कामांकडे थोडे दुर्लक्ष होणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शब्द थोडा जपून वापरा, लोकांमध्ये गैरसमज होण्याची शक्मयता आहे. बुधवारपासून व्यवसायात प्रगती संभवते. किरकोळ अडचणी आल्यातरी त्यातून मार्ग काढू शकाल. शेतीच्या कामात जास्त द्यावे लागेल. शिक्षणक्षेत्रात आतापासून अंतिम परीक्षेच्या तयारीला लागा. पुढचा काळ थोडा कठीण असणार आहे. कला, क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखीने कामे मिळतील. आर्थिक आवक वाढेल. वाहन जपून चालवा.


वृषभ

नोकरीतील महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्ण करा. कायद्याच्या संदर्भातील कामे लवकर पूर्ण करा. विचारवंतांचा सल्ला घ्या. बुधवार- गुरुवार जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करा. विरोधकांच्या चूका ओळखून ठेवा. व्यवसायात नवीन उपकरणे वापरून अजून वाढ करण्याचा प्रयत्न करा. कर्जाचा डोंगर कमी करण्याकरिता संधी लवकरच मिळेल. शेतीच्या कामात यश मिळेल. घर खरेदी करताना कागदपत्रे तपासून घ्या.


मिथुन

सूर्य, चंद्र षडा÷क योग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करतांना उतावळेपणा करून चालणार नाही. अरेरावी करू नका. धंद्यातील समस्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच सोडवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात  जास्त मेहनत घ्यावी लागेल. वरि÷ांना नाराज करू नका. नोकरीत सप्ताहाच्या शेवटी तणाव घडू शकतो. घरातील माणसे तुमच्याबरोबर राहतील, तो आधार वाटेल. कला-क्रीडा- शिक्षण क्षेत्रात नम्रता ठेवा. जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात योग्य सल्ल्याने बोला.


कर्क

सूर्य- चंद्र त्रिकोण योग, चंद्र- गुरु प्रतियुती होत आहे. या सप्ताहात तुमची कामे होतील. रविवार किरकोळ तणाव होईल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढवण्यासाठी योजना तयार करून मार्गी लावा. लोकप्रियता वाढण्याचा प्रयत्न करा. धंद्यात मोठे काम मिळेल. त्याची व्यापकता वाढवा. थकबाकी मिळवा. कला,क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. घरात शुभ समाचार मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करा. घर, जमीन घेण्याचे ठरवाल.


सिंह

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात जास्त मेहनत घ्या. नव्या पद्धतीचा वापर करा. मागील येणे-वसूली बुधवारपासून मिळवा.  राजकीय- सामाजिक कार्यात  आत्मविश्वासाने निर्णय घ्यावा लागेल. लोकांचा आग्रह राहील. संसारात वाटाघाटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कला- क्रीडा क्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नाही. मैत्री ठेवण्याचा प्रयत्न करा. कोर्टाच्या कामात अडचणी येतील.


कन्या

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र,शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात  जास्त लक्ष द्या. मोठे स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर सावध रहा. तुमची प्रति÷ा वाढेल. बुधवार, गुरुवारी विरोधक अडचणी निर्माण करतील. कला- क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व पैसा मिळेल. कोर्टकेस संपवता येईल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीत फायदा होईल. नोकरीत बदल करता येईल. विवाहासाठी स्थळे शोधा.


तुला

चंद्र, शुक्र प्रतियुती, मंगळ, गुरु केंद्रयोग होत आहे. या आठवडय़ात प्रत्येक कामात अडचणी येऊ शकतील. धावपळ वाढेल. विलंबाने यश मिळेल. सहनशीलता ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात जास्त मेहनत घ्या. लोकांना खूष ठेवा. धंद्यात प्रगती होईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल स्पर्धा कठीण असेल. कोर्टाच्या कामात अडथळे येतील. घरात किरकोळ वाद होईल.


वृश्चिक

मंगळ, गुरु केंद्रयोग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात विरोधक वाढतील. हल्लाबोल होईल. संयमाने सर्व समस्या सोडवता येतील. बुधवार, गुरुवार प्रवासात सावध रहा. कला, क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. घरातील समस्या कमी करता येतील. धंद्यात घाई नको. विचारपूर्वक निर्णय घ्या. मार्ग मिळेल. कोर्टकेसमध्ये फसगत संभवते.


धनु

धनु राशीला साडेसाती सुरू आहे. चंद्र, शुक्र प्रतियुती, मंगळ,गुरु केंद्रयोग होत आहे. धंद्यात वाद होईल. कामगार वर्गाची बाजी राहील. राजकीय, सामाजिक कार्यात बेसावध राहू नये. चूक होईल. घाईत निर्णय घेऊ नका. घरातील माणसे तुमच्या पाठीशी राहतील. वाटाघाटीची जबाबदारी तुमच्याकडे येईल. कला- क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. कोर्टकेसमध्ये जिद्द ठेवा.


मकर

साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात उत्साहाची व प्रगती असेल. राजकीय, सामाजिक कार्यात जिद्दीने योजना पूर्ण करण्याची तयारी ठेवा. प्रति÷ा मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. जुनी समस्या सोडवता येईल. कोर्टकेसमध्ये प्रगती होईल. कला,क्रीडा क्षेत्रात मोठय़ा लोकांचा परिचय होईल. स्पर्धा जिंकाल, घरात शुभ घटना घडेल.


कुंभ

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे बुद्धिचातुर्य वापरा. तुमच्या योजनांना गति द्या. लोकांच्या समस्येवर उपाय काढा. धंद्याला नवे वळण मिळेल. अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्टकेसमध्ये सावध रहा.


मीन

चंद्र गुरु त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. प्रत्येक दिवस प्रगती करणारा ठरेल. प्रयत्न ठेवा. सहनशीलता ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. किरकोळ अडचणी जवळचे लोक आणतील. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. घरात वाद व तणाव होईल. पण तात्पुरत्या काळासाठी असेल. कोर्टाच्या कामात यश येईल.

 

 

Related posts: