|Thursday, May 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालूप्रसादांची तब्येत अत्यंत खराब, राजद आमदाराचा दावा

लालूप्रसादांची तब्येत अत्यंत खराब, राजद आमदाराचा दावा 

रांची

 चारा घोटाळय़ाप्रकरणी 14 वर्षांचा कारावास भोगत असलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ठीक नसून ते सध्या रांचीच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची भेट घेतलेल्या राजदच्या एका आमदाराने लालूंच्या प्रकृतीबद्दल दिलेल्या माहितीने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरू शकते.लालूप्रसादांची प्रकृती अत्यंत खराब असून ते उभे राहू शकत नाहीत तसेच त्यांना नीटपणे बसता देखील येत नाही. त्यांची रक्तशर्करा पातळी देखील वाढल्याचे राजद आमदार रेखा देवी यांनी शनिवारी सांगितले. रेखा देवी यांनी रिम्समध्ये जात लालूंची भेट घेतली आहे. योग्य उपचार होऊ शकतील अशा ठिकाणी लालूंना हलविले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. डिसेंबर 2017 मध्ये चारा घोटाळय़ातील एका प्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांना रांचीच्या बिरसा मुंडा मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते. जानेवारी आणि मार्च महिन्यात आणखी दोन प्रकरणांसाठी त्यांना दोषी ठरविण्यात आले होते.

 

 

Related posts: