|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » रोनाल्डो होणार लवकरच चतुर्भूज!

रोनाल्डो होणार लवकरच चतुर्भूज! 

वृत्तसंस्था/ लंडन

पोर्तुगालचे आघाडीचे दैनिक कोरियो डा मन्हाने दिलेल्या वृत्तानुसार, स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो आपली मैत्रीण, प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्यूज हिच्याशी लवकरच विवाहबद्ध होणार आहे. रॉड्रिग्यूज व रोनाल्डो यांच्यात मागील दोन वर्षांपासून डेटिंग सुरु असून रॉड्रिग्यूजने या विवाहासाठी संमतीही दिली आहे. अर्थात, विवाहाच्या बोलणी आता सुरु झाल्या असल्या तरी रोनाल्डो व जॉर्जिना यापूर्वीपासूनच एकत्रित रहात आले असून या उभयतांना एक कन्यारत्नही आहे. ऍलाना मार्टिना असे तिचे नामकरण केले गेले आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तिचा जन्म झाला. रोनाल्डो व जॉर्जिओ ऍलानाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनमध्ये आले होते, यादरम्यान त्यांनी नोव्हॅक ज्योकोव्हिच व जॉन इस्नेर यांच्यातील एटीपी वर्ल्ड टूर फायनल लढतीचा आनंदही घेतला.