|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवसेनेतूनच लोकसभा लढवणार – प्रा. संजय मंडलिक

शिवसेनेतूनच लोकसभा लढवणार – प्रा. संजय मंडलिक 

वार्ताहर / व्हनाळी

लोकसभेसाठी काही पक्ष माझ्या उमेदवारी साठी सकारात्मक आहेत.                  हा स्व. मंडलिकसाहेबांच्या कार्याचा व विचारांचा गौरव आहे. परंतू माझा पक्ष ठरलेला असून मी शिवसेनेतूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे                प्रा.संजय मंडलिक यानी ठामपणे सांगून पुन्हा एकदा खासदारकीसाठी धनुष्य घेवून सज्ज असल्याचे सांगितले.

बेलवळे बुद्रूक ता. कागल येथील श्री दत दूध संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडलिक साखर कारखान्याचे माजी संचालक गणपतराव सावेकर होते.

मंडलिक म्हणाले विद्यमान खासदारांबद्दल  खोटय़ा व भबक्केबाज भुल भुलैया कारभारामुळे जनतेतून नाराजी आहे. त्यामुळे त्यांना सर्वच पक्षातून विरोध होत आहे. मी मात्र धनुष्य घेवून निवडणुकीस सज्ज असल्याचे सांगितले. समाजाचा विकास हा सहकारातूनच होतो. दत्त दूध संस्थेचे योगदान हे सभासदांबरोबरच संस्था व गावच्या विकासा साठी महत्वाचे ठरले आहे.

या वेळी माजी चेअरमन बाबूराव सावेकर यानी संस्था प्रगतीचा आढावा घेतला. स्वागत चेअरमन शंकर पाटील यानी केले. माजी सरपंच विलास पाटील यानी            प्रास्ताविकात स्व. खा. मंडलिक साहेबांचा संस्था जडणघडणीत मोलाचा वाटा असल्याचे सांगीतले.  या वेळी पाहुण्यांच्या हस्ते संचालक व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मंडलिक साखरकारखान्याचे संचालक मसू पाटील, धनाजी बाचणकर, शहाजी पाटील तसेच आनंदा कदम, शिवाजी पाटील, एम. एस. पाटील, शामराव पाटील, नारायण पाटील उपस्थित होते.

 

Related posts: