|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरीत पाच लाख वैष्णवांची मांदियाळी

पंढरीत पाच लाख वैष्णवांची मांदियाळी 

 

संकेत कुलकर्णी  /  पंढरपूर

         काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल /

         इथे नांदतो केवळ पांडुरंग //

संत एकनाथानी वर्णन केल्याप्रमाणे पंढरपूरात केवळ आणि केवळ पांडुरंगच सदैव नांदतो. आणि याच पांडुरंगाच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळयासाठी भूवैकुंठ नगरीत सुमारे पाच लाखांहून अधिक वैष्णवांची मांदियाळी भरली आहे. त्यामुळे अवघी पंढरी नगरी विठुनामाने दुमदुमुन गेली आहे.

आषाढी एकादशीस निद्रिस्थ झालेले विठ्ठल भगवंत कार्तिकी एकादशीस उठतात. आणि भक्तांची सेवा करतात. याचसाठी आषाढीनंतरची सर्वात मोठी एकादशी म्हणून कार्तिकीकडे पाहिले जाते. याकरिंता पंढरपूरात सध्या पाच लाखांहून अधिक भाविकांची दाटी झालेली आहे. कार्तिकी एकादशीस विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी महसुलमंत्री चंद्राकांत पाटील पंढरपूरात आले आहेत.

सोमवारी पहाटे एकादशींच्या महापूजेनंतर सोहळयाला सुरूवात होईल. दिवसभर हरिनामांचा गजर, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नानामधे भाविक मोठया प्रमाणावर मग्न असताना दिसून येणार आहेत. एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

मोठया संख्येने आलेल्या भाविकांमुळे विठ्ठलाची दर्शनरांग आज गोपाळपूरपर्यत जावून पोहोचली होती. त्यामुळे विठ्ठलांच्या दर्शनासाठी सरासरी 8 ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. तर मुखदर्शन अवघ्या 1 तासांमधे होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी संपूर्ण दर्शनमंडपामधे मोठया प्रमाणावर, पिण्यांचे पाणी, वेफ्ढर्स तसेच भोजन याशिवाय वैद्यकिय सुविधा या पुरविण्यात आलेल्या आहेत.

 आजच्या एकादशीच्या सोहळयासाठी एसटी प्रशासनाकडून सोडण्यात आलेल्या 1200 जादाच्या एसटी बस तसेच रेल्वेकडील विशेष रेल्वेगाडय़ा यांच्यामधून मोठया संख्येने भाविक पंढरपूरात रविवारी उशीरापर्यत दाखल झालेले आहेत. याशिवाय आज सोमवारी देखिल दिवसभरामधे अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक भाविक हे खाजगी वाहनाने देखिल पंढपूरात येउन दाखल होत आहे.

वारींच्या निमित्ताने सध्या पंढरपूरात होत असलेल्या गर्दीने संपूर्ण पंढरपूर हाऊसफ्gढल्ल झाले आहे. यामधे चंद्रभागेच्या पैलतीरावर असणाऱया 65 एकरमधील सर्व प्लॉट भाविकांना फ्gढलले आहेत. याठिकाणी साधारणपणे एक लाख 95 हजारांच्या आसपास भाविक असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. याशिवाय चंद्रभागेच्या वाळवंटात देखिल काही भाविक आहेत. शिवाय शहरामधील विविध चातुर्मासी मठ तसेच धर्मशाळा, लॉजेस यांच्या माध्यमातून देखिल भाविक वास्तव्यास आहेत. याशिवाय कार्तिकेचे मुख्य आकर्षण असणाऱया जनावरांच्या बाजारामधे देखिल सुमारे चार हजार जनावरे दाखल झाली आहेत.

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने बाजारातील जनावरांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. मात्र प्रत्यक्ष जनावरांच्या खरेदी-विक्रीस अपेक्षेप्रमाणे भाव मात्र येताना दिसून येत नाही. दुष्काळामुळे यंदा पंढरीत वारीला गर्दी कमी होईल. असेही बोलले जात होते. मात्र गत कार्तिकी यात्रेंच्या तुलनेत यंदा जादाची गर्दी झालेली दिसून येत आहे.

Related posts: