|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुढच्या भाऊबीजपूर्वी साळ गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार : मंत्री सुदिन ढवळीकर

पुढच्या भाऊबीजपूर्वी साळ गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार : मंत्री सुदिन ढवळीकर 

प्रतिनिधी/ डिचोली

  साळ या गावाच्या पाणी प्रश्नाबाबत आपल्याला पुर्ण जाणीव आहे. या भागात येणाऱया सहा महिन्याच्या काळात दहा एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प येणार आहे व तो एका वर्षात पुर्ण होऊन लोकार्पणही होणार आहे. पुढच्या भाऊबीज पुर्वी या भागात पाणीण पाणी असणार व हि समस्या कायमस्वरूपी मिटणार. काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. मात्र आता सर्व गोष्टी व सोपस्कर पुर्ण करून हा प्रकल्प लवकरात लवकर साकारण्यासाठी हे खातेही प्रयत्नरत आहे. असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी खरपाल लाटंबार्से येथे केले.

   खरपाल लाटंबार्से येथील श्री शांतादुर्गा मंदिराच्या खुल्या मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरेश सावळ, माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल, लाटंबार्सेचे सरपंच प्रशांत घाडी, नगरसेवक निसार शेख, मेधा बोर्डेकर, नरेश कडकडे, संध्या सावळ, विद्या परब, करूणा गोवेकर, पंचसदस्य समीर च्यारी, बबन राणे, रूपा रावळ, वीणा नाईक व इतरांची उपस्थिती होती.

    पुतळे जाळणारे स्वतः कर्माची फळे भोगणार

  मगो पक्षाचे काम व नाव ही मोठे आहे. त्याचप्रमाणे त्याची प्रति÷ाही मोठी आहे. पाण्याच्या समस्येसाठी  डिचोलीत नवीन एक कार्यकर्ता आंदोलन करतो. त्याचा भाऊ यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य होता तो का पडला. या वर त्याने प्रथम विचार करावा. आपला पुतळा जाळून काहीही होणार नाही, उलट पुतळे जाळणारे आपल्याच कर्माची फळे भोगणार. ज्या प्रकारे 2007- 08 साली एका प्रकरणाय आपला पुतळा जाळला होता. व नंतर त्यांनी त्याचे परिणामही भोगले. आताही तसेच होणार. असे यावेळी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या भाषणात हल्लीच डिचोलीत झालेल्या एका पाण्याच्या समस्येवरील मोर्चात त्यांचा जाळण्यात आलेल्या पुतळय़ाच्या प्रकरणी बोलताना म्हटले.

आजची राजकीय स्थिती पाहता मगो पक्षासाठी सर्वांनी एकत्रीत येणे गरजेचे

   आजची राजकीय स्थिती पाहता मगो पक्षाचे कार्य राज्यभर मोठे करण्यासाठी सर्वांनी एकत्रीत येणे गरजेचे आहे. मगो पक्षाने या राज्यावर सतरा वर्षे राज्य करताना दुरदृष्टी ठेऊन केलेले कार्य. गावागावात शाळा उभारून शिक्षण सर्वत्र पोहोचवण्यासाठी दिलेले योगदान राज्याच्या द्रूष्टीने मोठेच आहे. अशाच प्रकारचे कार्य यापुढेही साकारण्यासाठी मगो पक्षाला मोठा करण्याचे कार्य व जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यायला हवी. मगो हा या धरती मातेचा पक्ष आहे, त्याला या राज्यात पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी आम्ही पुढे आले पाहिजे. या राज्यात कोंग्रेसची सत्ता लोकांनी अनुभवलेली आहे. त्याच्या कार्यपध्दती विषयी जास्त काही सांगायची गरज नाही. असेही यावेळी मंत्री ढवळीकर यांनी पुढे म्हटले.

सुदिन ढवळीकर यांचा पुतळा जाळणे चुकीचा प्रकार.

डिचोली मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गेले दिड वर्ष मोठय़ा प्रमाणात वाढलेला आहे. या विषयावर आपणही आमदार असताना मोठा प्रकाश टाकला होता. या विषयाची जाण पुर्णपणे मंत्री ढवळीकर यांना आहे. मात्र काही दिवसांपूर्वी डिचोलीत जे घडले ते अत्यंत वाईट घडले. मंत्री ढवळीकर यांचा पुतळा जाळून या लोकांनी वाईट क्रूत्य केले आहे. मंत्री ढवळीकर यांच्या मार्फत गेल्या आपल्या आमदारकीच्या काळात मोठय़ा प्रमाणात विकासकामे झाली. अनेक जणांना सरकारी रोजगार मिळाले . आणखीन 50 ते 60 जणांची कामे त्यांच्या मार्फत होणार होती, म त्र नोकरभरती बंदीमुळे ती होऊ शकली नाही. अशा व्यक्तीचा पुतळा जाळणे वाईट आहे. त्यांना या व्यासपीठावरून उत्तर देणे म्हणजे आमच्याच प्रति÷sला शोभणारे नाही. असे यावेळी माजी आमदार नरेश सावळ यांनी म्हटले.

 यावेळी इतरांचीही भाषणे झाली. सुत्रसंचालन प्रिती नाईक यांनी केले तर आभार संध्या सावळ यांनी मानले.