|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कळंगूट येथे 11 लाखांचा अमलीपदार्थ जप्त

कळंगूट येथे 11 लाखांचा अमलीपदार्थ जप्त 

प्रतिनिधी/ म्हापसा

परबावाडा-कळंगूट येथे पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एका नायजेरियनकडून 11 लाखांचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. कळंगूट पोलिसांनी यंदाच्या वर्षी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

अटक करण्यात आलेल्या नायजेरियनचे नाव प्रँक नाथा निल (32) असे असून तो कळंगूट येथे राहात होता. त्याच्याकडून एमडीएमए (78 हजार), मोरपीन (40 हजार), एम्पेन गोळय़ा (72 हजार), गांजा (46 हजार) असा 11 लाख 5 हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ जीए 03 एजे 0845 या पॅशन स्कूटरमधून आणला होता. ती स्कूटर स्थानिकाची असून त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सदर स्कूटर जप्त करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जतीन पोतदार, महेश नाईक, सिताराम मळीक, प्रजीत मांद्रेकर, शिपाई श्रयेश साखळकर, पांडुरंग सामंत, लक्ष्मण पटेकर यांनी ही कारवाई केली. अधीक्षक चंदन चौधरी व उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी निरीक्षक दळवी यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, हा संशयित कळंगुटमध्ये अमलीपदार्थ तयार करत होता, अशी माहिती मिळाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. यात काही स्थानिक गुंतले असल्याची माहिती आहे.