|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » घाटे यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा

घाटे यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा 

ठप्प प्रशासनाविरोधात उपोषण सुरु

प्रतिनिधी/ पणजी

राज्याचे प्रशासन ठप्प झाल्याने अनेक ज्वलंत समस्या तशाच प्रलंबित आहेत. बेरोजगार, पॅसिनो, फ्ढाŸर्मेलिन यासारखे विषय दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासन योग्यरित्या चालण्यासाठी पर्यायी मुख्यमंत्री देणे आवश्यक आहे. तो योग्य पर्याय सरकारने द्यावा यासाठी राष्ट्रीय आरटीआय पुरस्कार विजेते कार्यकर्ते राजन घाटे यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आरंभले असून गत तीन दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना भेटून पाठिंबा जाहीर केला आहे.

रविवार दि. 18 रोजी घाटे यांना गोवा सुरक्षा मंचचे प्रक्षप्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर, शिवसेना गोवाचे सदस्य सचिव मिलिंद गांवस, आमदार रेजिनाल्ड फ्ढर्नांडिस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जोस फ्ढिलिप आणि उपाध्यक्ष अविनाश भोसले यांनी कार्यकर्त्यांसह घाटे यांची भेट घेऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

घाटेंची भूमिका योग्यच : वेलिंगकर

गोवा सुरक्षा मंचच्या 800 कार्यकर्त्यांचा मेळावा पर्वरीत झाला असून आपण पक्ष प्रवेश केल्यावर प्रथम राजन घाटे यांना भेटायला आलो आहे, असे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले. घाटे यांची भूमिका योग्य आहे व त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत. मंचचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल.

गोव्याची सद्यस्थिती पाहता खात्यांचे वाटप होत नाही, मुख्यमंत्री पदाचा भार कुणावर †िदलेला नाही व घटकपक्ष एकामेकांचे पाय ओढत आहेत. कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता, तो राजन घाटे यांनी घेतला असून ते गोव्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत म्हणून गोमंतकीयांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सरकारने त्यांची दखल घेतली पाहिजे, असेही प्रा. वेलिंगकर पुढे म्हणाले.

पर्रीकर विधानसभाही विकण्याच्या मार्गावर : लॉरेन्स

गोमंतकीयांना आज योग्य न्याय मिळत नाही. सर्व खात्यांचे प्रशासन ठप्प झाले आहे. गोमंतकीयांनी पुन्हा रस्त्यावर येणे गरजेचे आहे. 2012 साली मध्ये रंगाची टी-शर्ट घालून पर्रीकर रस्त्यावर उतरले होते. ज्या समस्या घेऊन ते रस्त्यावर उतरले त्यातील एकही समस्या अद्याप सुटलेली नाही. पर्रीकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंच, विद्या प्रबोधिनी विद्यालय विकले आहे. आता विधानसभाही विकण्याच्या मार्गावर आहे, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.

पर्रीकर यांनी नेहमीच काँग्रेसला चोर म्हटले असले तरी काँग्रेसने मुख्यमंत्र्याच्या आरोग्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ‘पॉलिटीशन हेव टु कॉल अ डे ऍण्ड डे’ हे वाक्य पर्रीकरांचे आणि ते जर आपल्या शब्दावर खरे असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे, असे सांगून घाटे यांना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सध्याच्या परिस्थितीला कंटाळून आता खुद्द मंत्रीदेखील विरोधात बोलू लागले आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा हेच योग्य असल्याचे ते म्हणाले. हाच प्रकार जर काँग्रेसने केला असता तर एकदम खालच्या स्तरावर जाऊन भाजपने राजकारण केले असते, असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही : जुझे फ्ढिलीप डिसोझा

राजन घाटे यांचा हेतू चांगला आहे. त्यामुळे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. खरेतर पर्रीकर यांनी राजीनामा देऊन दुसऱयाकडे जबाबदारी सोपविली पाहिजे होती. मात्र ते जबाबदारी अन्य कुणाकडे देत नाही त्यावरुन भाजपात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नसल्याचे स्पष्ट होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फ्ढिलीप डिसोझा यांनी सांगितले.

गोव्यात हुकूमशाही चालू आहे : भोसले

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश भोसले यांनी सांगितले की, आज मुख्यमंत्री आजारी असून आठ महिन्यांहून अधिक दिवस झाले आहे. गोव्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. मुख्यमंत्र्यांचे आरोग्य बिघडल्यास राज्याचे आरोग्यही बिघडते. मुख्यमंत्र्यांच्या उपचारांवर राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च होतो त्यामुळे त्यांना नेमके काय झाले व त्यांची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा गोमंतकीयांना हक्क आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एम्समध्ये होते. त्यावेळी दर तासात हेल्थ बुलेटीन येत होते. गोव्यात लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री स्वार्थासाठी सत्ता सोडत नाही : मिलिंद गांवस

यावेळी शिवसेना गोवाचे सदस्य सचिव मिलिंद गांवस यांनी सांगितले की, चार महिन्यांपूर्वी शिवसेनेने आंदोलन केले होते. त्यावेळी आम्ही प्रशासन ठप्प झाले असल्याचे म्हटले होते. आज सरकारातील मंत्रीही नाराजी व्यक्त करीत आहेत, त्यावरून ते स्पष्ट होत आहे. राजन घाटे यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. मुख्यमंत्री स्वार्थासाठी सत्तेला चिकटून आहेत, असेही ते म्हणाले.