|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संजीवनी खंडागळे यांच्या आधार व इतरकथा पुस्तकाचे प्रकाशन

संजीवनी खंडागळे यांच्या आधार व इतरकथा पुस्तकाचे प्रकाशन 

प्रतिनिधी :/ बेळगाव

   आधार आणि इतर कथासंग्रह आशयसमृध्द आहे. ग्रामीण बोली प्रभावी आहे. अभिव्यक्तीही सक्षम आहे. काही ठिकाणी मात्र कृत्रिम वाटते पुणेरी कलाकार मराठी सिनेमात शेतकऱयांची भूमिका करताना जशी ग्रामीण बोली बोलतात तशी भाषा लेखिका संजीवनी खडांगळे यांनी आपल्या आधार व इतर कथासंग्रहात मांडली आहे. असे मत राणी चन्नम्मा विद्यापिठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी मांडले.

रविवारी संजीवनी खंडागळे यांच्या आधार व इतर कथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जे÷ पत्रकार अशोक याळगी, संजीवनी खंडागळे, गजानन खंडागळे उपस्थित होते.

प्रारंभी शितल बडमंजी यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.  उपस्थित मान्यवरांचे पुष्प व पुस्तक देवून स्वागत करण्यात आले. यावेळी संजीवनी खंडागळे यांनी लिहिलेल्या आधार आणि इतरकथा या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संजीवनी खंडागळे म्हणाल्या हा माझा पहिला कथासंग्रह आहे, मला गोष्टी सांगण्याचे, रचण्याचे वेड लहानपणापासून लागले असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक याळगी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रवीन जाधव, बाबू खंडागळे, शैलजा सुर्यवंशी, जनार्धन काळे, शिरिष काळे, लता नगरे, शारदा काळे, जयंत खंडागळे, दौलत राणे, सुभाष अनगोळकर, अनुजा खंडागळे, उर्मिला शहा, स्मिता किल्लेकर, निळूभाउ नार्वेकर, अंकुश पालेकर, एन.एन शिंदे, अश्विनी ओगले, शिवाजी कागणीकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा अशोक अलगोंडी यांनी केले. तर आभार ऍड. गजानन खंडागळे यांनी मानले.