|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » मराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या

मराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधकांनी पायऱयांवर ठिय्या दिला. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वागत विरोधकांच्या घोषणांनी झाले.

अधिवेशन हिवाळी असले तरी मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण, दुष्काळ आणि कर्जमाफी या मुद्यांनी अधिवेशन चांगलेच तापणार आहे. त्याची झलकही आज पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. दुष्काळ निवारणाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही, मराठा आरक्षणाबाबत अजूनही संदिग्धता आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. ‘वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. मराठा समाजाला ओबीसीच्या उपप्रवर्गात आरक्षण द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. स्वतंत्र कोट्यात आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही, असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे मराठा आमदारही विधीमंडळ परिसरात आक्रमक झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असे बॅनर घालून आमदारांनी घोषणाबाजी केली.

Related posts: