|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » मोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक

मोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील सुरू असलेल्या वादावर तोडगा निघण्याची शक्मयता आहे. बैठकीत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा यासाठी काही वर्गाचा दबाव आहे. तरी उर्जित पटेल केंद्रीय बँकांचे धोरणं मांडण्याची शक्मयता आहे. बैठकीत ते एनपीए संबंधित धोरणांचे समर्थन करु शकतात. एनपीएच्या तरतुदींबाबत गव्हर्नर पटेलांसह चार डेप्युटी गव्हर्नर संयुक्तरित्या बाजू मांडतील, तसेच स्वतंत्र संचालक या मुद्यालाही समर्थन देऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. अर्थ मंत्रालय नेमलेले सदस्यांसह काही स्वतंत्र संचालक उर्जित पटेल यांच्यावर निशाना साधू शकतात. सरकार आणि रिझर्व्ह बँक, बँकात तातडीने सुधारीत उपायांच्या रुपरेषा आणि एमएसएमई क्षेत्राला कर्ज देण्याच्या तरतुदीला शिथिल करण्यासंबधी एकमताने समाधानकारक निर्णयावर पोहचू शकतात. या बैठकीत केंद्र आणि रिझर्व्ह बँक यांच्यात तोडगा निघाला नाही, तरी येणाऱया काही दिवसात सुधारात्मक निर्णंयावर एकमत होऊ शकते असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. त्यासोबतच काही बँका चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत या रुपरेषेच्या आराखडय़ातून बाहेर पडू शकतात. सध्या 21 सार्वजनिक बँकांमधील 11 बँका पीसीएच्या अंतर्गत आहे. ज्यात नवीन कर्ज देण्यासाठी कडक नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत. या बँकांमध्ये अलाहाबाद बॅँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, देना बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे.

Related posts: