|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » इंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई

इंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई 

पुणे / प्रतिनिधी ः

सध्या तंत्रज्ञान शाप की वरदान असे म्हणण्याची वेळ आली आहे. एखाद्या गोष्टीची गती जेव्हा शापाकडे वाढत जाते, तेव्हा विचार करण्याची गरज निर्माण होते. कुटुंबातील सगळी माणसे देखील एकत्र असताना आपापल्या मोबाईलमध्ये प्रत्येकजण व्यस्त असतो. इंटरनेटमुळे कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध परदेशी कंपन्या हजारो डॉलर कमावत आहेत. परंतु आपल्यासारख्या विकसनशील देशातील तरुण पिढी याची शिकार होत आहे. इंटरनेटच्या या विळख्यात लहानांपासून ज्ये÷ांपर्यंत सर्वजण अडकले आहेत, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र यंदा 10 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या आणि देशातील तिसऱया इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र पुण्यामध्ये सुरु झाले आहे. टिळक रस्त्यावरील अभिनव चौकातील विशाल सह्याद्री सदन येथील मनोविकास मानसोपचार केंद्राचे उद्घाटन टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी शेती महामंडळाच्या अप्पर जिल्हा दंडाधिकारी वर्षा लड्ढा, रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, नगरसेविका नीलिमा खाडे, बीव्हीजी ग्रुपचे डॉ. दत्तात्रय गायकवाड, अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, मानसोपचार तज्ञ डॉ. आमोद बोरकर, महेश वाडेकर, हर्षल पंडित, अमित खैरे, राजन चांदेकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुक्ता टिळक म्हणाल्या, पुढील पिढीला सांभाळणे ही आपली जबाबदारी असून आपण जबाबदार नागरिक घडवित असतो. त्यांच्या हातूनच समाजाची व राष्ट्राची प्रगती होणार आहे. तंत्रज्ञानातील चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टींवर प्रहार केला पाहिजे. या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्राला पालिकेकडून सहकार्य करू, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

डॉ.अजय दुधाणे म्हणाले, भारतामध्ये दिल्ली आणि बंगळुरु येथे इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरु झाली आहेत. त्यामुळे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सुरु करण्यात येणारे इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र देशातील तिसरे आणि राज्यातील पहिले केंद्र असणार आहे. युवकांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये दिवसेंदिवस इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत असल्याने या नवीन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: