|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » मोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी

मोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी 

नवी दिल्ली / प्रतिनिधी

मोदी देशातील प्रत्येक संस्था उद्ध्वस्त करीत असून, त्यांच्या स्वातंत्र्यावर व अधिकारांवर घाला घालत असल्याच्या आरोप राहुल गांधी यांनी येथे केला.

आरबीआयच्या संचालक मंडळाची बैठक सुरू असताना राहुल यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. ‘देशातील प्रत्येक संस्था नियंत्रणाखाली यावी, यासाठी मोदी आणि त्यांचा गट प्रयत्नशील आहे. संचालक मंडळाच्या बैठकीतही ते आपल्या गटातील लोकांच्या माध्यमातून आरबीआयला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील. पण, उर्जित पटेल आणि त्यांचे सहकारी मोदींचा हा प्रयत्न हाणून पाडतील,’ अशी अपेक्षाही राहुल यांनी व्यक्त केली.

 

Related posts: