|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » सई ताम्हणकरच्या पहिल्या वेबसीरिजचे पोस्टर झाले रिलिज

सई ताम्हणकरच्या पहिल्या वेबसीरिजचे पोस्टर झाले रिलिज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड एलिस्टर सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच डेट विथ सईह्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

सई ताम्हणकरच्या पहिल्या वेबसीरिजचे पोस्टर झाले रिलिज

डिसेंबरपासून सुरू होणाऱया ह्या वेबसीरिजविषयी सध्या खूप उत्कंठा आहे. ह्या वेबसीरिजशी निगडीत सूत्रांच्या अनुसार, ही एक थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वतःच्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वतःच्याच भूमिकेत दिसेल. ह्या सूत्रांच्या अनुसार, ह्या वेबसीरजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमेऱयात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल.

सई ताम्हणकर म्हणली, ‘डेट विथ सई सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामूळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचे तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकते, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणाऱया ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Related posts: