|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय बाजार तेजीसह बंद

भारतीय बाजार तेजीसह बंद 

सेन्सेक्स 318 अंकानी वधारला, निफ्टी 10,750 च्या वरती

वृत्तसंस्था/ मुंबई

नवीन सप्ताहाची सुरुवात भारतीय शेअरबाजारात तेजीच्या वातावरणात झाली आहे. यात सेन्सेक्स व निफ्टीत 0.75 टक्क्यांनी मजबूत होत बंद झालेत. युरोपीय बाजातील समाधानकारक झालेल्या वातावरणाचा सकारात्मक परिणाम सोमवारच्या भारतीय बाजारावर झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.

आरबीआय आणि सरकार यांच्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला वादावर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकित योग्य मुद्यावर चर्चा घडवून आणली जाणार होती आणि त्याचाच फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला असून त्यामुळे बीएसई व निफ्टी समभागात तेजी राहिली होती.

राष्ट्रीय शेअर बाजार (निफ्टी)10,775 पोहोचला, भारतीय शेअर बाजार (बीएसई) 35,800 चा टप्पा गाठण्यात यशस्वी झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्समध्ये समाधानकारक खरेदी झाल्याचे दिसून आले. बीएसई मिडकॅपचा निर्देशाक 0.4 टक्क्य़ांनी वधारत बंद झाला. तर निफ्टी मिडकॅपचा निर्देशाकात 0.5 वाढ नोंदवण्यात आली.

भारतीय शेअर बाजारातील(बीएसई) मुख्य शेअर्सचा निर्देशाक 318 अंकाच्या तेजीसह वधारत 35,775 वर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजारात (एनएसई) च्या मुख्य शेअर्सचा निर्देशाक 81 अंकानी म्हणजे 0.75 टक्क्यांनी उसळी घेत 10,763.3 वर पोहोचत बंद झाला आहे.

औषध, धातू, माध्यम, आयटी, ऑटो, वीज आणि एफएमसीजी या कंपन्यांच्या शेअर्अमध्ये समाधानकारक खरेदी झाली. पीएसयु बँकेच्या शेअर्समध्ये दबावाचे वातावरण राहिले. तर बँक निफ्टी 0.25 टक्क्यांनी वधारत 26,301 वर बंद झाले. आयटीसी, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, सन फार्मा, आणि वेदान्ता यांचे समभाग 6.7 ते 2.2 टक्क्यांनी उसळी घेतली.