|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्थायी करणार मालमत्तांच्या घरपट्टीचा हिशोब

स्थायी करणार मालमत्तांच्या घरपट्टीचा हिशोब 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेच्यावतीने मालमत्ताचे पुनर्रसर्वेक्षण करण्यात आले होते. पण सदर काम थांबविण्या आल्याने याचा जाब स्थायी समिती सदस्यांनी बैठकी उपस्थित केला. यापुर्वी  पुनर्रसर्वेक्षण करून कर आकारणी करण्यात येणाऱया मालमत्ताची पाहणी करून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अर्थ स्थायी समिती मालमत्तांच्या घरपट्टीचा हिशोब घेणार आहे.

मनपा अर्थ, कर आणि महसुल स्थायी समितीचे बैठक सोमवारी झाली. पुढंलिक परीट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोजक्मयाच विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. महापालिकेचा महसुल बंद झाला असल्याची चर्चा होत आहे. तसेच महसुल उत्पन्नाला गळती लागली असल्याचा आरोप होत आहे. यामुळे महसुलाबाबतचा आढाच सादर करण्याची सुचना सदस्यांनी केली. 2018-19 आर्थिक वर्षात 37 कोटी मालमत्ता कर आकारणी करण्याचे उद्दिष्ट आहे.पण यापैकी आतापर्यत 26 कोटी 50 लाखाची घरपट्टी वसुल करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. मालमत्तांचे पुनर्रसर्वेक्षण करण्याची मोहिम राबविण्यात येत होती. पण सध्या ही मोहिम का बंद ठेवण्यात आली असा जाब विचारण्यात आला. महसुल विभागाचे कर्मचारी सध्या निवडणूक कामात व्यस्त असल्याने पुनर्रसर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले आहे. जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती प्रभारी महसुल उपायुक्त ए.एस.कांबळे यांनी दिली. यापुर्वी पुनर्रसर्वेक्षण करून कर आकारणी करण्यात येणाऱया मालमत्ताची पाहणी पुढील आठवडय़ात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

खंजर गल्ली लक्ष्मी मार्केटच्या जागेत पार्किग सुरू करण्याचा ठराव करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी का केली नाही असा प्रश्न ऍड. रतन मासेकर यांनी उपस्थित केला. कर्मचारी अपुरे असल्याने पार्किग सुरू केले नसल्याचे थातूर मातूर उत्तर देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न महसुल उपायुक्तांनी केला. पण मनपाचे कर्मचारी नव्हे, तर हंगामी कंत्राट पध्दतीने कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय झाला असताना याकडे दुर्लक्ष का अशी विचारणा केली. पण याबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले.

बैठकीला महापौर बसाप्पा चिकलदिन्नी, उपमहापौर मधूश्री पुजारी, रमेश सोंटकी, माजी उपमहापैर रेणु मुतकेकर, रूपा नेसरकर, श्रेयला जीनगौडा, आरोग्य अधिकारी डॉ.शशीधर नाडगौडा, प्रभारी कौन्सिल सेपेटरी एफ.बी. पिरजादे आदीसह अधिकारी उपस्थित होते. 

Related posts: