|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » श्री गजानन महाराज भक्तांचे तिसरे राज्यस्तरीय वार्षिक संमेलन पुण्यात

श्री गजानन महाराज भक्तांचे तिसरे राज्यस्तरीय वार्षिक संमेलन पुण्यात 

पुणे / प्रतिनिधी :

श्री गजानन महाराज महाराज (शेगांव) भक्तांचे तिसरे राज्यस्तरीय वार्षिक संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनात राज्यभरातून 5 हजाराहून अधिक भक्त सहभागी होणार आहेत. या वेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गजानन सेवारत्न पुरस्कार सोहळादेखील होणार आहे. हे संमेलन 24 व 25 नोव्हेंबर रोजी अप्पर इंदिरानगर येथील महेश सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सर्व गजानन महाराज मंदिर व श्री गजानन महाराज सेवाधारी न्यासतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन 24 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता होणार असून यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारूदत्त आफळे हे गजानन महाराज यांच्यावर निरूपण करणार आहेत. या दोनदिवसीय संमेलनात डॉ विकास बाहेकर, शंकर महाजन, ह. भ. प. पुष्कर महाराज गोसावी, पंडित उपेंद्र भट, अरविंद कुलकर्णी, सुनील देशपांडे व विश्वास साठे हे विविध विषयावर निरूपण, प्रवचन व भक्ती संगीतातून सेवा देणार आहेत. त्याचबरोबर रविवारी 25 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वा. नाशिकच्या सुमती बापट व औरंगाबादच्या कुसूम वाडेकर यांना प. पू. सद्गुरू नाना महाराज तराणेकर यांचे शिष्य विश्वास साठे यांच्या हस्ते ‘गजानन सेवारत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे.

Related posts: