|Thursday, May 23, 2019
You are here: Home » उद्योग » आरबीआयकडून सरकारला वर्षासाठी 65 हजार कोटी अधिशेष

आरबीआयकडून सरकारला वर्षासाठी 65 हजार कोटी अधिशेष 

5 वर्षात उत्पन्नाच्या 75 टक्के हिस्सा सरकारला हस्तांतरीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने गेल्या 5 वर्षाच्या दरम्यान सरकारला अंदाजे 2.5 लाख कोटी रुपये हस्तांतरीत केले आहेत. ही रक्कम बँकेच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 75 टक्के हिस्सा आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षकने गेल्या वर्षात सरकारच्या आर्थिक खात्याचे विश्लेषण करत आरबीआयच्या उत्पन्नाची माहिती दिली आहे. आरबीआयद्वारा सरकारला सर्वात जास्त रक्कम आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती की जी उत्पन्नाच्या 83 टक्के होती.

येणाऱया काळात आरबीआयच्या आरक्षित हस्तांतरणावरून वाद होत असल्याचे समोर येत असून त्याअर्थी सरकारने देय वाढवण्याची आवश्यकता आहे.  इकॉनॉमिक सर्वेक्षणानुसार आरबीआयकडे इतर केंद्रीय बँकांपेक्षा जास्त आरक्षण आहे. वर्ष 2017 वगळून आरबीआयने सरकारला वर्षासाठी सुमारे 65 हजार कोटी रुपयाचे अधिशेष हस्तांतरीत केले आहेत.

आर्थिक वर्ष 2015-16 पर्यंत आरबीआयचा खर्च 15 हजार कोटी रुपये पेक्षाही कमी होता, पण त्यानंतरच्या वर्षात हा खर्च 31 हजार कोटी रुपये पर्यंत पोहोचला आहे. कारण नोटाबंदीनंतर आरबीआयला चलन छपाईसाठी मोठा खर्च उचलण्यात आला. गेल्या महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर विरल आचार्य यांनी जादा डिव्हिडंडसाठी सरकारला निशाणा केले होते. याच दरम्यान त्यांनी अर्जेंटीनाचे उदाहरण देत केंद्रीय बँकेच्या स्वायत्तेत सरकारने हस्तक्षेप करू नये असे सांगितले. 

Related posts: