|Friday, May 24, 2019
You are here: Home » उद्योग » मारुतीने ‘विटारा ब्रेजा’चे उत्पादन वाढविले

मारुतीने ‘विटारा ब्रेजा’चे उत्पादन वाढविले 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या ‘विटारा ब्रेजा’च्या उत्पादनात वाढ केली आहे. त्यामुळे खरेदीसाठी प्रतिक्षा करण्याचा वेळ कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत कंपनीने या वाहन उत्पादनात वर्षाच्या आधारावर 10 टक्क्यांची वाढ करत 94 हजार युनिट निर्माण केले आहेत. गुजरातमधील सुझुकी मोटार कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यरत असून त्याची वार्षिक क्षमता 2.5 लाख युनिट आहे. उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी निर्देशक आर. एस. कल्सी यांनी सांगितले.

येणाऱया काळात या उत्पादनासाठी लागणारी प्रतिक्षा चार ते सहा आठवडय़ांची असेल. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 1.48 लाख विटारा ब्रेजा विक्री केल्या होत्या. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सात महिन्यात कंपनीने 95 हजार विटारा ब्रेजा विक्री केल्या आहेत.

Related posts: