|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » नितेश कुमार ‘इमामी’चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

नितेश कुमार ‘इमामी’चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी 

नवी दिल्ली

 इमामी समूहाच्या रिअल इस्टेट कंपनी इमामी रिअल्टीने नितेश कुमार यांना नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त केले आहे. या अगोदर ते दिल्लीच्या टीडीआई समूहामध्ये होते. कुमार हे आता एस. राममूर्ती यांची जागा घेणार आहेत. कुमार यांच्याकडे सुमारे 25 वर्षाचा अनुभव असून त्यापैकी 19 वर्षाचा कालावधी हा टीडीआय समूहमधील आहे. त्यांनी सप्टेंबरमध्ये टीडीआय समूहाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता इमामी समूहामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.