|Friday, May 24, 2019
You are here: Home » क्रिडा » नेशन्स लीग स्पर्धेत हॉलंड अंतिम फेरीत

नेशन्स लीग स्पर्धेत हॉलंड अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था/लंडन

युफा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत हॉलंडने अंतिम स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. सोमवारच्या सामन्यात हॉलंडने बलाढय़ जर्मनीला 2-2 असे बरोबरीत रोखले. नेशन्स लीग स्पर्धेतील अंतिम टप्पा पुढीलवर्षी होणार असून हॉलंडने विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सला मागे टाकले आहे.

हॉलंड आणि जर्मनी यांच्यातील सामन्यात हॉलंडने शेवटच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदवून जर्मनीला 2-2 असे बरोबरीत रोखले. जर्मनीतर्फे टिमो वेर्नर आणि लिरॉय सॅने यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर हॉलंडतर्फे क्विन्से प्रोमेस आणि व्हॅन डिजेक यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. येत्या जूनमध्ये होणाऱया चार संघांमध्ये अंतिम स्पर्धेत स्वित्झर्लंड, इंग्लंड, यजमान पोर्तुगाल या संघांचा यापूर्वीच समावेश झाला आहे.

Related posts: