|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आमराईसह उदयानातील हजारो रोपे पाण्याविना जळली

आमराईसह उदयानातील हजारो रोपे पाण्याविना जळली 

उदयान अधीक्षकांचा हलगर्जीपणा, नुकसान भरपाई वसुल कराःउत्तम साखळकर

प्रतिनिधी / सांगली

उदयान अधीक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे आमराईसह मनपा क्षेत्रातील अनेक उदयानातील हजारो रोपे पाण्याविना जळाली असून याची नुकसान भरपाई वसुल करावी अशी मागणी मनपाचे विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर यांनी पत्रकार बैठकीत केली.

मनपाने आमराईसह मनपा क्षेत्रात अनेक उदयाने विकसित केली आहेत. या उदयानामध्ये विविध प्रकारची रोपे, तसेच वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र उदयानाच्या दैनंदिन व्यवस्थापन, संरक्षण आणि पाणी सोडण्यासाठी आवश्यक कर्मचारी नसल्याने उदयानातील झाडे जळून जात असल्याचे सांगून विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर म्हणाले, उदयान अधीक्षक कोरे यांच्या हलगर्जीपणामुळे उदयानातील झाडे आणि रोपे जळून खाक होत आहेत.

पाणीचे सोडले जात नाही, कर्मचारी नसल्याचे कारण सांगितले जाते, पण नवीन कर्मचारी घ्यावेत, किंवा मानधन किंवा बदली कर्मचाऱयांची नियुक्ती करावी पण उदयानातील रोपे, झाडे जगवावीत अशी मागणी केली मात्र याकडे दुर्लक्षच केले जात आहे. सध्या आमराई तसेच शास्त्राr उदयान, त्रिकोणी बाग, सानेगुरूजी उदयान, बापटबाल उदयान आदी ठिकाणच्या उदयानातील हजारो रोपे जळून खाक झाली आहेत. आमराईत ट्रकच्या बाजुने नवीन लावलेली रोपेही पाण्याअभावी जळाली आहेत. सकाळी फिरायला आलेली नागरिक जाब विचारत आहेत असे असताना उदयान अधीक्षकांना याचे कोणतेही गांभिर्य नाही. त्यामुळे त्यांच्या हलजर्गीपणामुळेच आज लाखो रूपयांची रोपे जळाली असून याप्रकरणी त्यांच्याकडून झालेल्या नुकसान भरापाई वसुल करावी अशीही मागणी यावेळी विरोधीपक्ष नेते साखळकर यांनी पत्रकार बैठकीत केली.

अधी झाडे जगवा आणि मग संगीत लावा

मनपाने आमराईमध्ये फिरायला येणाऱयासाठी उत्साहाचे वातावरण असावे यासाठी तेथे संगीतधुन बसविण्याचा निर्णय घेतला आहे यावर बोलताना साखळकर म्हणाले, झाडे जगली तरच तेथे नागरिक फिरायला येतील त्यामुळे अगादेर झाडे जगवा आणि मगच संगीत बसवा अशीही टिका यावेळी साखळकर यांनी केली.