|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा

पक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा 

 

प्रतिनिधी/ पणजी

 आमदारकीच्या पदावर असताना दुसऱया पक्षात प्रवेश करतात अशा आमदारांना पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंद घालावी अशा मागणीची याचिका मगो पक्षतर्फे उच्चन्यायालयात दाखल केली आहे, असे यावेळी मागो पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष ऍड. नारायण सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

 पक्ष बदलू आमदारावर कारवाई करावी यासाठी निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहे. काही आमदार सत्तेचा लालसासाठी पक्ष बदलतात याचा फटका त्या पक्षावर होतो त्याचप्रमाणे त्याचा कार्यकर्त्यांना तसेच जनतेला त्रास होतो. पुन्हा निवडणूका घेत असल्याने सरकारी खर्चही वाया होतो. त्यामुळे जे आमदार पक्ष बदलतात अशा आमदाराना पाच वर्षाच्या काळासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालावी जेणेकरुन कोणी असे पक्ष बदलणार नाही, असे यावेळी नारायण सावंत यांनी सांगितले.

 मगो पक्षाला गोव्यात मोठा इतिहास आहे. गोव्यात सुमारे 86 आमदारांना मगो पक्षाने आतापर्यंत निवडून दिले आहे. त्यातील सुमारे 26 आमदारांनी पक्षातर केले आहे. नुकतेच काँगेसच्या अनेक आमदारानी भाजपात प्रवेश केला आहे. खरे तर ही याचिका कॉग्रेस पक्षाने उच्च न्यायालयात दाखल करण्याची गरज होती. पण मगो पक्षातफें आम्ही ही दाखल करत आहे. आम्ही सरकारचा भाग आहे त्यामुळे सरकार विरोधात आमची याचिका नाही. पण जे आमदार स्वार्थासाठी पक्षबदलतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मगो पक्षाचे सर्व आमदार एकसंध असून ते कुठल्याच पक्षात जाणार नाही मगोची तत्वनिष्टा ही एक आहे. त्यामुळे हा पक्ष हे आमदार सोडणार नाही, असे यावेळी मगोपक्षाचे उपाध्यक्ष रत्नकांत म्हार्दोळकर यांनी सांगितले.

 

 

Related posts: