|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संरक्षण सल्लागार मरुफ रझा यांचे शनिवारी व्याख्यान

संरक्षण सल्लागार मरुफ रझा यांचे शनिवारी व्याख्यान 

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रबुद्ध भारत संस्थेच्यावतीने शनिवार दि. 24 रोजी सायंकाळी 6 वाजता गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात संरक्षण सल्लागार आणि धोरणात्मक मार्गदर्शक मरुफ रझा यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

भारतासमोरील सुरक्षेची आव्हाने आणि भारतीय लष्कराकडून घेतली जाणारी पूर्वतयारी या संदर्भात ते व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

मरुफ रझा हे भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. विविध लष्करी कारवायांमध्ये सहभाग घेऊन विजयी मालिकेबद्दल त्यांनी पुरस्कारही मिळविले आहेत. तज्ञ म्हणून लष्करी आणि सुरक्षाविषयक चर्चांसाठी त्यांना आमंत्रित केले जाते. ते दिल्ली येथील असून किंग्स कॉलेज लंडन येथून युद्धांचा अभ्यास या विषयावर त्यांनी एमए केले आहे. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी एमफील केले आहे. या विषयातील त्यांचा अभ्यास दांडगा असून त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. यामुळे त्यांचे विचार मौलिक असून याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे. 

Related posts: