|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » येवला -मनमाड मार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

येवला -मनमाड मार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नाशिक :

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

अर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अर्टिगामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अनकाई बारी जवळील ही दुर्घटना आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये अर्टिगा कारचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाय, मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेऊन अपघातग्रस्त गाड्या वेगळय़ा करण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण नगर आणि कोपरगाव येथील रहिवासी होते. मृतांची ओळख पटवण्याचे कार्य सुरू आहे.

आयशर गाडी मनमाडच्या दिशेने जात होती, तर अर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाडय़ा येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Related posts: