|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतून चार वर्षात 26 हजारांपेक्षा जास्त मुली-महिला बेपत्ता

मुंबईतून चार वर्षात 26 हजारांपेक्षा जास्त मुली-महिला बेपत्ता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2013 पासून 2017 पर्यंत मुंबईतून तब्बल 26 हजारांपेक्षा जास्त मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी 2,264 जणींचा अद्यापही शोध लागलेला नाही.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मंगळवारी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा आणि इतर आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देत ही माहिती दिली. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. मुख्यमंत्री गृहखाते सांभाळण्यास कमी पडत असल्याची टीका विरोधक वारंवार करतात, आता महिलाच्या सुरक्षेसंदर्भातील ही बाब त्यांनीच मांडल्याने पुन्हा एकदा ते टीकेचे धनी बनू शकतात. 2013 ते 2017 या चार वर्षांत मुंबईतून एकूण 26, 708 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. यात 5, 056 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांपैकी 24,444 जणींचा शोध लागला. पण 2,264 जणी अद्यापही बेपत्ता आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

Related posts: