|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गोकुळमुळे ग्रामीण अर्थकारणाल गती

गोकुळमुळे ग्रामीण अर्थकारणाल गती 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे, गोकुळमुळेचे  ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली. असे प्रतिपादान राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष  डॉ. प्रतापराव पाटील यांनी  56 व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त गोकुळ तर्फे आयोजित महिला मेळाव्यामध्ये केले. अध्यक्षस्थानी चेअरमन विश्वास पाटील होते.

 ते म्हणाले, की ग्रामीण भागाचा सहकारमुळे विकास झाला असून यामध्ये गोकुळचा फार मोठा वाटा आहे. सहकारी संस्थांमुळे महाराष्ट्रात ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व दूध उत्पादकांचा विकास झालेला आहे.

दीपप्रज्वलन चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी  अप्पर निबंधक उत्तम इंदुलकर कथा-कथणकार प्रा.आप्पासाहेब खोत, सहाय्यक निबंधक, डॉ.गजेंद्र देशमुख, गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, संचालक विश्वास जाधव, बाळासो खाडे, पी. डी. धुंदरे, दीपक पाटील, उदय पाटील,  जयश्री पाटील-चुयेक। अनुराधा पाटील, उर्मिला पाटील, संघाचे अधिकारी, कर्मचारी व महिला उपस्थित होत्या. आभार संचालिका अनुराधा पाटील यांनी मानले. 

Related posts: