|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

पुणे / प्रतिनिधी :

कारा इंटलेक्स यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संलग्नतेने सहावी इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2018 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर होणार असल्याची माहिती पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, क्लबचे सचिव आनंद परांजपे आदी उपस्थित होते. विनायक द्रविड म्हणाले, या स्पर्धेत 15 संघ सहभागी होणार असून, सर्व सामने प्रकाशझोतात होतील. प्रत्येक संघात एकूण 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. 6 षटकांचे हे सामने होणार असून, टेनिस बॉलने खेळले जातील. याला सर्व टेनिस बॉलचे नियम लागू असून, सायंकाळी 4.30 ते 10.30 या वेळेत हे सामने खेळविण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत अंजेनेयज् ब्रेव्ह बेअर्स, आर्यन स्कायलार्क्स, गोखले सिनर्जी कोब्राज, गोल्डफिल्ड डॉल्फीन्स्, गुडलक हॉग्स लिमये, ट्रूस्पेस जॅगवॉर्स, सुपर लायन्स्, जीएससी पँथर्स्, रेड बुल्स, स्वोजस टायगर्स, ओव्हन प्रेश टस्कर्स्, एनएच वुल्वस्, डी-एच लिंक चिताज्, आर स्टॅलियन्स्, कासट ड्रगन्स हे 15 संघ सहभागी होणार आहेत. 3 गटात संघांची विभागणी करण्यात आली असून, गुणसरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील, असे द्रविड यांनी नमूद केले.