|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुण्यात होणार

लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुण्यात होणार 

ऑनलाईन टीम / पुणे :

उद्यमशीलता, उच्चशिक्षण, सद्विचार आणि एकत्रित कुटुंब ही पारंपरिक मूल्ये जपत समाजाने नवा विचार व नवी दिशा आत्मसात करावी या प्रमुख उद्देशाने अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याजवळ मारुंजी येथील लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमध्ये शनिवार 24 व रविवार 25 नोव्हेंबर रोजी हे भव्य अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी यांनी ही माहिती दिली आहे. राजकारण व समाजकारणातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती आणि समाजातील तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध व्यवसाय क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींची आयोजित करण्यात आलेली व्याख्याने हे या अधिवेशनाचे आकर्षण ठरणार आहे. तसेच एकत्र कुटुंब पद्धतीची जोपासना, सामाजिक सुधारणा आणि सामाजिक विकासाबद्दल या अधिवेशनात काही सामाजिक ठराव देखील करण्यात येणार आहेत. शनिवार 24 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनातील उद्योजकता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात येणार आहे. रविवार 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कैलाश वाणी यांचे अध्यक्षीय भाषण होणार असून अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार राजू शेट्टी, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय अधिवेशनात तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. बांधकाम, विपणन, शेती, फार्मास्युटिकल्स, उद्योजकता आणि सामाजिक एकीच्या माध्यमातून विकास या विषयांवर या सत्रांमध्ये भर देण्यात येणार आहे. यात 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 पासून होणाऱया सत्रांमध्ये ज्ये÷ पत्रकार विजय कुवळेकर, पोलिस महानिरिक्षक कृष्णप्रकाश, ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर, ‘जेएलएल इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, ‘ऍनारॉक’चे अध्यक्ष अनुज पुरी, ‘क्रिसालिस ग्रुप’चे अध्यक्ष मनीष गुप्ता, अन्न व औषध विभागाचे माजी सहसंचालक संजय पाटील, ‘सीरम इन्स्टिटय़ूट’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव, ‘एन्टोड फार्मा’चे व्यवस्थापकीय संचालक किशोर मासुरकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तर 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या सत्रांमध्ये गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे, ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा हे मार्गदर्शन करणार आहेत.

Related posts: