|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीसीआयच्या टर्फ विकेटचे उद्घाटन

सीसीआयच्या टर्फ विकेटचे उद्घाटन 

बेळगाव / क्रिडा प्रतिनिधी :

गणेशपूर रोडवरील असलेल्या क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूट या अकादमीच्या वतीने करण्यात आलेल्या नव्या टर्फ विकेटचे उद्घाटन मोठय़ा उत्साहात पार पडले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, कर्नाटकचा कर्णधार विनयकुमार, मुंबई इंडियन व कर्नाटकचा रणजिपूट श्रेयश गोपाळ, कर्नाटकचे मुख्य प्रशिक्षक यरेगौडा, सहप्रशिक्षक एस. अरविंद,  क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूटचे संचालक निशिल पोतदार, मि. इंडिया सुनिल आपटेकर वेणुग्राम को- ऑप. सोसायटीचे संचालक राकेश कलघटगी उपस्थित होते. यावेळी कर्नाटकचा कर्णधार विनयकुमार म्हणाला की, मी 16 वर्षाचा असताना कर्नाटक संघात समावेश करण्यात आला. त्यावेळी माझ्या संघाचा कर्णधार दीपक चौगुले होता. या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक दीपक चौगुले व संचालक निशिल पोतदार यांनी बेळगाव शहरात नवे मैदान व टर्फ खेळपट्टी निर्माण केली आहे. याचा बेळगाव शहरातील उदयोन्मुख क्रिकेटपटुंनी लाभ घ्यावा, टर्फ विकेटवर खेळणे हे क्रिकेट पटुंच्या कारकिर्दिला महत्वाचे असते असे शेवटी सांगितले.

यावेळी निशिल पोतदार यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून स्वागत केले. क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूटच्या मैदानावर पाच खेळपट्य़ा निर्माण करण्यात आल्या आहेत. सरावासाठी क्रिकेट नेट्स सुद्धा सुसज्ज अशा करण्यात आल्या आहेत.

 

Related posts: