|Monday, July 22, 2019
You are here: Home » Automobiles » मारुतीची ‘इनोव्हा’ लूकची अर्टिगा लॉन्च

मारुतीची ‘इनोव्हा’ लूकची अर्टिगा लॉन्च 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं बुधवारी अर्टिगाचं नवीन व्हेरिएंट लॉन्च केलं. या नव्या व्हेरिएंटची किंमत ७.४४ लाख रुपये ते १०.९ लाख रुपये आहे. गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ७.४४ लाख ते ९.९५ लाख रुपये आहे. तर डिझेल व्हेरिएंटची किंमत ८.८४ लाख ते १०.९ लाख रुपये आहे. अर्टिगाच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा ७१ हजार रुपयांनी जास्त आहे. तर डिझेल मॉडेलची किंमत २० हजारांनी जास्त आहे.

मारुतीकडून ४.२ लाख अर्टिगाची विक्री

मारुती अर्टिगाचं हे मॉडेल होंडा सीआरव्ही, महिंद्र मजारो यांच्याशी स्पर्धा करेल. सगळ्यात पहिले २०१२ साली भारतीय बाजारात अर्टिगा आली होती. आत्तापर्यंत कंपनीनं ४.२ लाख अर्टिगाची विक्री केली आहे. कंपनीनं अर्टिगाचे १० व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.